तेल्हारा: स्मशानभूमीची स्वच्छता करून सिरसोली मध्येआगळी वेगळी होळी
Telhara, Akola | Mar 24, 2024 दिनांक 24 मार्च 2024 रोजी सायंकाळी ५ वाजता शिरसोली गावातील सर्व सामाजिक संघटना यांच्यातर्फे स्मशानभूमी स्वच्छता आणि ग्रामस्वच्छता करून आगळी वेगळी होळी, हा आधुनिक उपक्रम राबवण्यात आला, या मोहिमेमध्ये गुरुवंदन सत्यशोधक बहुउद्देशीय संस्था सिरसोली छावा संघटना, शिरसोली सेवाधारी गट, शिरसोली फुले शाहू आंबेडकर विचारधारा मंडळ, शिरसोली सहभागी झाले होते यावेळी किर्तनकार सत्यपाल महाराज यांनी सर्व तरुण मुलांना मार्गदर्शन केले, डॉक्टर धर्मापाल चिंचोळकर यांनी प्रार्थनेचा विषयावर महत्त्व सांगितले.