तेल्हारा: माळेगाव बाजार येथे शांतता समितीची सभा आयोजन
Telhara, Akola | Mar 22, 2024 तेल्हारा पोलिस स्टेशनांतर्गत येत असलेल्या माळेगाव बाजार येथील ग्रा.पं. कार्यालयात आज संध्याकाळी 5 वाजता शांतता समितीची सभा उत्साहात पार पडली.यावेळी सध्या रमजान महिना सुरू असून आगामी होळी, ईद, शिवजयंती यासारख्या सण उत्सवा दरम्यान सामाजिक सलोखा कशाप्रकारे गावकऱ्यांनी राखला पाहिजे, याबाबत तेल्हारा पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रमोद उलेमाले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सभेला ग्रा. पं.उपसरपंच सलीम खान शब्बीर खान, सदस्य विकास चिकटे, सुरेश इंगळे, पो. पा. रितेश ठाकूर यांच्या सह नागरिक उपस्थित होते