बुलढाणा: युतीसाठी इतके प्रयत्न केले की भाजपा समोर नाक रगडण्याचा बाकी होतं!आ.संजय गायकवाड
बुलढाणा नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा पूजा संजय गायकवाड यांनी शिवसेनेच्यावतीने नगराध्यक्ष पदासाठी आपला नामांकन अर्ज आज 17 नोव्हेंबर रोजी दुपारी दाखल केला.यावेळी आमदार संजय गायकवाड जिल्हाप्रमुख ओम सिंग राजपूत शहर प्रमुख गजेंद्र दांदडे शिवसेना नेते विजय अंभोरे यांच्यासह शिवसेना आणि युवासेनेचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. अर्ज दाखल केल्यानंतर बुलढाणा आ. संजय गायकवाड म्हणाले की महायुतीसाठी आम्ही भरपूर प्रयत्न केले भाजप समोर नाक रगडण्याचे बाकी होते.