कन्नड: जामडी तांडा येथील खुन प्रकरणाचा पुरावा शोधण्यासाठी पोलिसांची जंगलात मोहीम , जबाबही नोंदवले
तालुक्यातील जामडी तांडा येथील शेतकरी राजू रामचंद्र पवार (४५) यांचा खून झाल्याची घटना उघडकीस आली असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक घटनास्थळी ठाण मांडून होते. मंगळवारी सकाळी शेतात गेलेले राजू पवार घरी न परतल्याने शोध घेतला असता त्यांचा अर्धनग्न मृतदेह जंगलातील ओढ्यात आढळून आला. श्वानपथक, फॉरेन्सिक तज्ज्ञ व ग्रामीण पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत तपास केला, मात्र ठोस धागेदोरे हाती आले नाहीत.