चाळीसगाव: बंजारा संघर्ष योध्दा सतीष राठोड यांचे जंगी स्वागत; उपोषणानंतर घरी परतले, पण रुग्णालयात धमकीचा गंभीर प्रकार!
एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी सहा दिवस अन्नत्याग अमरण उपोषण करणारे बंजारा संघर्ष योध्दे सतीष भाऊ राठोड यांचे मूळगावी, दडपिंप्री तांडा (ता. मालेगाव) येथे ग्रामस्थांकडून जंगी आणि भव्य स्वागत करण्यात आले. उपोषणानंतर आठ दिवस धुळे येथील हिरे मेडीकल कॉलेजमध्ये उपचार घेतल्यानंतर काल (सोमवारी/दिनांक) सायंकाळी ७ वाजता ते घरी परतले. यावेळी गावकर्यांनी वाजत-गाजत त्यांची मिरवणूक काढली.