तेल्हारा: तालुक्यात रमजान ईद उत्साहात साजरी, हिंदू बांधवांनी दिल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा
Telhara, Akola | Apr 11, 2024 तेल्हारा तालुक्यात गुरुवारी सकाळी रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. तालुक्यातील तेल्हारा, पचंगव्हाण, अडगाव, हिवरखेड, तळेगाव बाजार, माळेगाव, बेलखेड, दानापुर, भांबेरी येथील मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केल्यानंतर रमजान ईद साजरी केली. यावेळी हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. मुस्लिम बांधवांनी एक महिना उपवास करून रमजान ईदनिमित्त लहान मोठ्यांना नविन कपडे घेऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या.