जटपूरा गेट परिसरात खंडणीसाठी सराईत गुन्हेगार टोळीकडून पानठेल्यावर धुडगूस घालून तोडफोड केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबतची तोंडी तक्रार रामनगर पोलिसात दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईटनकर यांच्या कुटुंबाचा पानठेला गेल्या २५ वर्षांपासून या भागात सुरू आहे. ६ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता आरोपी मोहसिन शेख हा पानठेल्यावर आला आणि ओमकडे सरळ २० हजार रुपयांची खंडणी मागितली.