नागपूर - जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर रस्ता ओलांडताना काही व्यक्तींसह कित्येक वन्य प्राण्यांची ही मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अशातच खुमारी परिसरात गुरुवार दिनांक 5 फेब्रुवारीला दुपारी एक वाजता च्या दरम्यान परिसरातील वीट भट्ट्यांवर काम करणारे पुरुष व महिला मजूर सरपणासाठी डोक्यावर मोळ्या घेऊन जीवघेणा राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असतानाचे दृश्य भयावह होते.