आज दि 3 फेब्रुवारी दुपारी दोन वाजता गंगापूर–छत्रपती संभाजीनगर मुख्य रस्त्यावर दोन दुचाकींचा समोरासमोर भीषण अपघात झाला. मतदान केंद्रांच्या मतदार याद्या घेऊन जात असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात दोन्ही दुचाकी चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने गंगापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात मतदार याद्या रस्त्यावर पडलेल्या दिसून आल्या. यामुळे महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे की, या मतदार याद्या नेमक्या कुठे व कोणा