पालम तालुक्यातील केरवाडी येथील शेतकरी किशन विश्वनाथराव जाधव यांनी पालम पोलीसात तक्रार दिली आहे की त्यांचे चुलते जगनाथ किशनराव जाधव यांच्या घरासमोर ठेवलेले सोयाबीनचे 34 कट्टे अज्ञात चोरट्यांनी पिकअप वाहनात टाकून लंपास केल्याची घटना आज मंगळवार 25 नोव्हेंबर रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. सदर घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.