नाशिक: कुंभमेळा प्राधिकरण आयुक्तांकडून घाटांची पाहणी
Nashik, Nashik | Nov 28, 2025 नाशिक – कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह आणि महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी आज गोदावरी तीरावरील रामकुंड ते अमरधामपर्यंतच्या घाटांची पाहणी केली. अधिकारी पथकासह झालेल्या या पाहणीत घाटांची दुरुस्ती, कठडे बसविणे, रस्त्यांची सुधारणा, पायाभूत सुविधा, आपत्ती व्यवस्थापन, पाण्याची खोली, विद्युतीकरण आदी तपासण्यात आल्या. कुंभमेळ्यासाठी देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सर्व सुविधा वेळेत पूर्ण करणार करणार आहे.