बार्शी: तुळजापूर पायीवारीत भक्तांना खड्डयांचा त्रास, भूमकरांचा सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा #jansamasya
वैराग माढा रोडवरील खड्डेमय स्थितीबाबत वैरागचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे खड्डे बुजवण्याची मागणी केली आहे. मागील अनेक दिवसांपासून या रस्त्याची दुरवस्था झाल्याने प्रवाशांसह तुळजापूरच्या पायीवारीला जाणाऱ्या भक्त भाविकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत त्यांनी ६रोजी दुपारी १वाजण्याच्या सुमारास संवाद साधला. रस्त्यावर वारंवार अपघात घडत असल्याने जीविताला धोका निर्माण झाला आहे. भूमकर यांनी तत्काळ दुरुस्ती न झाल्यास रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.