सांगोला: महायुती एकजुटीने रिंगणात; सांगोल्यात भाजप-शिवसेना-RPI लढणार एकत्र - माजी आमदार शहाजी पाटील
सांगोल्याचे माजी आमदार शहाजी पाटील यांनी ६ रोजी दुपारी ३ च्या सांगोला नगरपालिका निवडणूक शिवसेना,भाजप आणि आरपीआय या महायुतीच्या प्रमुख पक्षांसह मित्रपक्ष एकजुटीने लढणार आहेत. त्यांनी सांगितले की, निवडणूक पारदर्शक आणि जनसहभागाने पार पडावी, यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. शहर विकासावर बोलताना पाटील यांनी प्रलंबित कामे पूर्णत्वास नेण्याचे तसेच पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, गटार व्यवस्थापन आणि झोपडपट्टी विकासावर विशेष लक्ष देण्याचे आश्वासन दिले आहे.