शाहूवाडी: शाहूवाडी तालुक्यातील शेंबवणे येथील पाझर तलाव फुटला, 35 एकर शेतीचे नुकसान
लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेला पाझर तलाव बुधवारी फुटल्याने शेंबवणेत तब्बल कोट्यवधी लिटर पाणी वाया गेले असून, सुमारे ३५ एकर शेती मातीखाली गाडली गेली आहे. जलसंधारण विभाग आणि ठेकेदारांच्या संगनमताने निकृष्ट दर्जाचे आणि नियोजनशून्य काम केल्यामुळेच हा अनर्थ ओढवला असल्याचा आरोप आज गुरुवार 17 जुलै दुपारी बाराच्या दरम्यान ग्रामस्थांनी केला आहे.