पेठ (ता. आंबेगाव) येथे खत व औषध दुकानातून चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना मंचर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे आठ लाख ११ हजार २०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती मंचर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी दिली.