चंद्रपूर - मुल आणि पोंभूर्णा तालुक्यातील ३९ शेतकऱ्यांचे धान पीक 'सॉलिड' या कीडनाशकाच्या दुष्परिणामामुळे धान पीक मोठ्या प्रमाणात खरपटून गेले असल्याची तक्रार राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली होती. आ. मुनगंटीवार यांनी याची गंभीर दखल घेत तत्काळ चौकशीचे आदेश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना दिल्यानंतर आयपीएल कंपनीकडून तब्बल ३० लाख ९७ हजार ८०० रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली.