साकोली: बोरगाव परसटोला येथे अंगणात ठेवलेल्या मोटरसायकलची चोरी,साकोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
साकोली तालुक्यातील बोरगाव परसटोला येथील चैतराम रघुनाथ नामूर्ती यांनी अंगणात ठेवलेली हिरो एचएफ कंपनीची काळ्या रंगाची त्यावर पांढऱ्या रंगाचे पट्टे असलेली मोटरसायकल क्रमांक MH 35 ए एफ2412 तिची किंमत तीस हजार रुपये आहे.ही अज्ञात चोरट्याने शनिवार दि 15 नोव्हेंबरला दुपारी चार वाजता चोरली चेतराम नामूर्ति यांनी केलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरटयाविरुध्द साकोली पोलीस ठाण्यात रविवार दि16 नोव्हेंबर दुपारी दोन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे