आज दि 3 फेब्रुवारी दुपारी 2 वाजता छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्यात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट दुचाकींविरोधात ग्रामीण पोलिसांनी कडक कारवाई करत विशेष मोहीम राबवली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीररीत्या सायलेन्सर मॉडिफाय केलेल्या बुलेटस्वारांमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता ही कारवाई करण्यात आली. मा. पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या आदेशानुसार पैठण, वैजापूर, गंगापूर, कन्नड, सिल्लोड व फुलंब्री तालुक्यांमध्ये तपासणी करून ३२ बुलेट दुचाकींवरील मॉडिफाईड सायलेन्सर