तेल्हारा: अवकाळी पावसाने तेल्हारा तालुक्याला झोडपले ,गहू हायब्रीड कांदा आंबा लिंबू पिकाचे मोठे नुकसान
Telhara, Akola | Apr 10, 2024 तेल्हारा तालुक्यात मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास अचानक ढग भरून आले त्यानंतर प्रचंड विजांचा कडकडाट सुरू झाला आणि वादळी वाऱ्यासह पावसाला जोरदार सुरुवात झाली जवळपास तासभर या पावसाने आकांतांडव सुरू केला या अवकाळी पावसाने शेतातील गहू हायब्रीड कांदा लिंबू आंबा व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे तेल्हारा तालुक्यातील दानापूर पंचगव्हान कोठा रायखेड माळेगाव बाजार चांगलवाडी या भागासह संपूर्ण तालुक्यात अवकाळी पावसाने शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे