बीड तालुक्यातील चाकररवाडी–येळमघाट रस्त्यावर चालकाचा ताबा सुटल्याने कारचा भीषण अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी तीव्र वळणे असूनही दिशादर्शक फलक आणि पथदिवे लावण्यात आलेले नाहीत, त्यामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे, रस्ता झाल्यापासून हा सातवा अपघात असून, अपघातांची मालिका सुरूच आहे.