शिरपूर तालुक्यातील महादेव दोंदवाडा शिवारात वनविभागाच्या जमिनीवर छापा टाकून लाखो रुपये किमतीची गांज्याची झाडे जागीच नष्ट करत एका संशयितास तालुका पोलिसांनी अटक केली आहे.16 डिसेंबर रोजी तालुक्यातील महादेव दोंदवाडा शिवारातील वनविभागाच्या जमिनीवर ही कारवाई करण्यात आली.छाप्यात सदर ठिकाणी सुमारे 5 ते 6 फूट उंचीची गांज्याची झाडे आढळून आली. एकूण १ हजार ७०२ किलो वजनाची व अंदाजे ८५ लाख १३ हजार ६०० रुपये किमतीची गांज्याची झाडे जागीच नष्ट करण्यात आली.