जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू आहे. मात्र पिशोर सर्कलमधील जिल्हा परिषद कन्या शाळा, शेफेपुर येथील मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याचे चित्र समोर आले आहे. रॅम्प, व्हीलचेअर, तसेच मदतनीस यांसारख्या मूलभूत सोयींचा अभाव असल्याने दिव्यांग मतदारांना मतदान करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.