बार्शी: खाजगीकरणाविरोधात महावितरण कर्मचाऱ्यांचा बार्शीत ७२ तासांचा लक्षणीक संप
खाजगीकरण आणि पुनर्रचनेच्या विरोधात बार्शी येथे महावितरण कर्मचाऱ्यांनी आजपासून (गुरुवार) दुपारी ३ च्या सुमारास ७२ तासांचा लक्षणीक संप सुरू केला आहे. सात संघटनांच्या कृती समितीच्या नेतृत्वाखाली हा संप होत असून, हा आंदोलनाचा सातवा टप्पा आहे. कर्मचारी प्रशासनाकडून सुरू असलेल्या खाजगीकरण व एकतर्फी पुनर्रचनेला तीव्र विरोध दर्शवत आहेत. दरम्यान, संपामुळे वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून आउटसोर्सिंग कर्मचाऱ्यांकडून काम सुरू ठेवण्यात येत असल्याचे दिसून आले आहे.