मागील दोन दिवसांपासून श्री समर्थ क्रीडा संकुल रामटेक येथे खेळल्या गेलेल्या मातृका फाउंडेशन जिल्हा महिला क्रिकेट टूर्नामेंटचे समापन रविवार दिनांक 8 फेब्रुवारीला सायंकाळी साडेपाच वाजता च्या दरम्यान पुरस्कार वितरणाने करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मान्यवर उपस्थित होते. महिलांचा चषक मातृका फाउंडेशन स्ट्रायकर्स रामटेक टीमने जिंकला तर मुलींचा चषक अथर्व इलेव्हन नागपूर यांनी जिंकला. खैरी बिजेवाडा क्रिकेट संघ व अभिरुची क्रिकेट संघ उपविजेता ठरला.