साकोली: साकोली तालुक्यातील वडद येथे मानव धर्माचे भव्य सेवक संमेलन व सामूहिक एकतेचे हवन कार्य
परमपूज्य परमात्मा एक सेवक नागपूर यांच्या सौजन्याने साकोली अंतर्गत परिसरातील सर्व सेवकांच्या वतीने वडद येथे मानवधर्माचे भव्य सेवक संमेलन व सामूहिक एकतेचे हवनकार्य गुरुवार दि 20 नोव्हेंबरला सकाळी6 ते सायंकाळी6या दरम्यान आयोजित करण्यात आले आहे या संमेलनाला परिसरातील 50 हजार पेक्षाही अधिक सेवकांनी उपस्थिती दर्शवलेली आहे परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरचे अध्यक्ष रविंद्रजी गायधने उपाध्यक्ष देवरामजी तुमसरे यांची प्रमुख उपस्थिती आहे