चाळीसगाव: एच यू एच मुंडिया पब्लिक स्कूल, चाळीसगावमध्ये विद्यार्थी परिषद निवडणूक उत्साहात पार! ९८% हून अधिक विक्रमी मतदान
चाळीसगाव: लोकशाही मूल्यांची बीजे शालेय स्तरावरच रुजवण्यासाठी एच यू एच मुंडिया पब्लिक स्कूल, चाळीसगाव येथे १९ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेली शालेय विद्यार्थी परिषद निवडणूक २०२५ मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरित्या संपन्न झाली. विद्यार्थ्यांनी दाखवलेला उत्साह वाखाणण्याजोगा असून, या निवडणुकीत ९८ टक्क्यांहून अधिक विक्रमी मतदान नोंदवले गेले, जे त्यांच्या जागरूकतेचे आणि सक्रिय सहभागाचे प्रतीक आहे.