पनवेल : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पनवेल महानगरपालिकेच्या वतीने विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून ब्लाइंड ऑर्केस्ट्राच्या सुरेल गायनाने कार्यक्रमाला विशेष उजाळा मिळाला. दिव्यांग कलावंतांच्या कला, प्रतिभा आणि जिद्दीला वंदन करण्यासाठी नागरिकांची मोठी उपस्थिती होती