सांगोला: शेतकरी कामगार पक्षासह अनेक नेत्यांचा भाजपकडे ओढा; मोठा पक्षप्रवेश १० ऑक्टोबरला
सांगोल्यात १० ऑक्टोबर रोजी भाजपचा मोठा पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी ८ ऑक्टोबर सायं.६ च्या सुमारास पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षासह इतर पक्षांतील अनेक नेते आणि कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री बावनकुळे, पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित राहणार आहेत.