बार्शी: वैराग हादरले! गाव तळ्यात नवजात स्त्री अर्भकाचा मृतदेह आढळला
बार्शी तालुक्यातील वैराग शहरात हृदयद्रावक घटना घडली असून, हिंगणी-मळेगाव रोडवरील गाव तळ्यात शुक्रवारी (३ ऑक्टोबर) सायंकाळी ७.३० च्या सुमारास एका नवजात स्त्री अर्भकाचा मृतदेह आढळला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. माहिती मिळताच वैराग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अर्भक पाण्याबाहेर काढले. वैद्यकीय तपासणीत अर्भक मृत असल्याचे निष्पन्न झाले. मृतदेह तपासासाठी बार्शीमार्गे सोलापूर येथे पाठवण्यात आला असून, या निष्ठुर कृत्यामागील आरोपीचा शोध सुरू आहे