वर्धा: हृदयद्रावक! वर्धा-समृद्धी महामार्गावर येळाकेळी जामजवळ अपघात, अपुऱ्या विश्रांतीमुळे निष्पाप तरुणाचा बळी..
Wardha, Wardha | Nov 14, 2025 वर्धा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर येळाकेळी जामजवळ मध्यरात्री झालेल्या एका भीषण अपघातामध्ये एका २२ वर्षीय चालकाला आपला जीव गमवावा लागला आहे.हा अपघात समृद्धी महामार्गाच्या मुंबई कॉरिडॉरवरील चॅनेज क्रमांक ६०/२०० येथे १४ नोव्हेंबर २०२५ च्या पहाटे २ वाजून ५५ मिनिटांनी घडला.अपघातग्रस्त वाहन आहे, आयशर क्रमांक MH-12-PQ-1220 असल्याचे रात्री नऊ वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे