चाळीसगाव: आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वात चाळीसगावात विकासकामांचा महायज्ञ; 'मॉडेल शहर' बनवण्याचा निर्धार!
चाळीसगाव: आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रभाग क्र. ८ आणि ११ मधील नागरिकांच्या प्रचंड उत्साहात रेल्वे स्टेशन पोलीस चौकीजवळ झालेल्या भव्य जाहीर सभेत सहभाग घेतला आणि चाळीसगाव शहराच्या विकासाचे व्हिजन (Vision) प्रभावीपणे मांडले. तत्पूर्वी, त्यांनी हनुमानवाडी येथील हनुमान मंदिरात श्री मारुतीरायाचे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केले.