खामगाव येथील श्री. साईराम ग्रुप च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील थंडीच्या दिवसात गरजवंतांना ब्लॅंकेटचे वितरण करण्यात आले. या उपक्रमांतर्गत डॉक्टर पाळावे यांच्या सेवा संकल्प प्रतिष्ठान पळसखेड(सपकाळ) येथे १२१ ब्लॅंकेट देण्यात आले तर ३९ ब्लॅंकेट इतर ठिकाणी गरजूंना वितरित करण्यात आले आले. यावेळी श्री साईं राम ग्रुपचे अध्यक्ष मयुर शर्मा, ईशान खीरऴकर, सुमित पवार, महेश भाई, देवा गोस्वामी, बंटी मोरजानी हे उपस्थित होते.