तालुक्यातील पिंपळनेर पोलिसांनी अवैध वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई
Beed, Beed | Nov 28, 2025 बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलिसांनी अवैध वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे.आज शुक्रवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२:३० वाजता पिंपळनेर पोलिसांनी अवैध वाळूने भरलेली लॉरी अडवत अमर नामदेव टपळे या चालकास ताब्यात घेतले. अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईतून वाहन आणि वाळू असा एकूण १० लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.सदर कारवाई सपोनि मधुसुदन घुगे आणि पोलीस उपनिरीक्षक अर्जुन गोलवाल यांच्या पथकाने केली आहे.