आज दि 6 फेब्रुवारी दुपारी 3 वाजता छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर समीर राजूरकर यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले. महापौर पद एकच असते, त्यामुळे एकाच नावाची घोषणा होत असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड, आमदार संजय केनेकर आणि जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्यासह भारतीय जनता पार्टीने माझ्यावर दाखवलेला विश्वास माझ्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे त्यांनी म्हटले. छत्रपती संभाजीनगर शहराचा पहिला महापौर