आज दिनांक 10 फेब्रुवारी संध्याकाळी 7 वाजता गंगापूर छत्रपती संभाजीनगर रोडवरील सेव्हन स्टार गॅरेज समोर भीषण अपघात होऊन दोन जण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक अनिकेत मुळक, शुभम वाघमारे आणि रोहित शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना गंगापूर घाटी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.