देवळी: गांजा, कार, मोपेड आणि मोबाईल!LCB ची धडक कारवाई! लाखो रुपयांचा गांजा जप्त, ३ आरोपी जेरबंद; एक फरार
Deoli, Wardha | Nov 14, 2025 वर्धा जिल्ह्यातून. अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.वर्ध्याचे पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी जिल्ह्यात अंमली पदार्थ बाळगणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. या आदेशांनुसार, स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध एक विशेष मोहीम हाती घेतली असल्याचे आज 14 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळवि