निफाड तालुक्यात महसूल विभागाचा धडाका ; तीन ठिकाणी विनापरवाना गौणखनिज वाहतूक करणारी वाहने जपत - नाशिक - छत्रपती संभाजीनगर मार्गासह चांदोरी, कसबे सुकेणे व सायखेडा परिसरात महसूल विभागाने सलग तीन कारवायांमध्ये विनापरवाना गौणखनिज वाहतूक करणारे डंपर व हायवा जप्त केले. दोन दिवसांत झालेल्या या कारवायांमुळे अवैध वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहेत. निफाडचे तहसिलदार मा.विशाल नाईकवाडे यांचे नेतृत्वाखाली मंडळ अधिकारी रूपाली सावळे, मंडळ अधिकारी जयंत लिलके, तलाठी कैलास शांताराम आहिरे,