मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली गावात घरफोडी करत अज्ञात चोरट्याने ६५ हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दि. ९ डिसेंबर रोजी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनतर्फे देण्यात आली आहे.