धरणगाव: चिमुकलीच्या मारेकऱ्याला फाशी द्या; श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे धरणगाव तहसीलदारांना निवेदन
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात घडलेल्या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाचे वातावरण आहे. एका ४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी गुरुवार २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता धरणगाव येथे श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्तानच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.