अहिल्यानगर–बीड–परळी या अत्यंत महत्वाच्या रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात गती मिळाली असून बीड ते वडवणी या टप्प्यावर आज रेल्वे इंजिनाची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. हा रेल्वे प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला होता. अहिल्यानगर ते बीड पर्यंतचे काम याआधीच पूर्ण करण्यात आले आहे. सध्या बीड ते परळी या मार्गाचे काम प्रगतीपथावर असून, त्यातील बीड ते वडवणी हा टप्पा पूर्ण झाल्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे इंजिनाची चाचणी घेण्यात आली.