देवगाव रंगारी येथे शेती पिकांना पाणी देण्यासाठी वीजपुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी आज अचानक आंदोलन छेडले. वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पिके धोक्यात आली असून, याबाबत तक्रारी करूनही तोडगा न निघाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयाकडे वारंवार चकरा मारूनही आश्वासनांपलीकडे काहीच मिळाले नाही. अखेर आज असंख्य शेतकरी कार्यालयासमोर एकत्र जमले आणि अधिकाऱ्यांना जाब विचारला.