गिरड येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार समिर कुणावार यांच्या मार्गदर्शनात भारताचे माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त जेष्ठ मान्यवरांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपा, जिल्हा उपअध्यक्ष प्रफुल्ल बाडे,प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा महामंत्री आकाष पोहाणे, तालुका अध्यक्ष हेमंत राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य फकीरा खडसे,जेष्ठ नेते अरुण मोटघरे,तालुका महामंत्री विनोद कन्हाळकर,जिजयाताई तेलरांधे उपस्थित होते.