कन्नड तालुक्यातील जैतापूर येथील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीच्या साहाय्याने कॉपीचा प्रकार उघडकीस आला.या गंभीर प्रकरणात तब्बल १९ पर्यवेक्षक आणि केंद्रसंचालकावर निलंबनासह कठोर कारवाई करण्यात आली आहे.या धडक कारवाईमुळे प्रत्यक्ष तपासणीपुरते न थांबता आधुनिकतंत्रज्ञानाद्वारे प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.