जालना शहर महानगरपालिकेसाठी दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी होणार्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरातील 291 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मंगळवार दि. 13 जानेवारी 2026 रोजी दुपारी 4.30 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी तथा जालना शहर महानगरपालिका आयुक्त आशिमा मित्तल यांनी आज शहरातील विविध मतदान केंद्रांना भेट देऊन तेथील मूलभूत सुविधांचा सविस्तर आढावा घेतला. या पाहणीदरम्यान व्ही. एस.एस.कॉलेज,दिनदयाळ उपाध्याय हॉल (विद्युत कॉलनी), ऑक्सफर्ड इंग्रजी शाळा आधीची पाहणी केली.