सध्या परिसरात सर्वत्र कडाक्याची थंडी वाजत असून, या थंडीचा आणि सामसूम वातावरणाचा फायदा घेत चोरट्यांनी आता आपला मोर्चा ग्रामीण भागातील सहकारी संस्थांकडे वळवला आहे. लाखनी तालुक्यातील पेंढरी (मोठी) येथील 'समीर दुग्ध उत्पादन सहकारी संस्था मर्या.' या डेअरीचे शटर उघडून अज्ञात चोरट्यांनी ४६,००० रुपये किमतीचे साहित्य चोरून नेल्याची घटना १६ जानेवारीच्या पहाटे उघडकीस आली. या धाडसी चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.