आर्णी: EVM मशीनची FLC व सीलिंग प्रक्रिया तहसील कार्यालय सभागृहात पडली पार
Arni, Yavatmal | Nov 15, 2025 आगामी आर्णी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या तयारीत प्रशासनाने गती आणली असून शनिवारी घेतलेल्या FLC (First Level Checking) नंतर र EVM मशीन सीलिंगची प्रक्रिया तसिल कार्यालयात पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्यात येत आहे. तहसील कार्यालयातील सभागृहात तांत्रिक पथक, निवडणूक शाखेचे कर्मचारी आणि विविध प्रभागांतील पक्षप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि VVPAT मशीनची अचूकता तपासण्यात आली.