आईसोबत झालेल्या किरकोळ वादानंतर रागाच्या भरात शहरातील हरिविठ्ठल नगर भागातील २५ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना, सोमवारी १ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता घडली आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.