भंडारा: ६७ लाखांचा लाईट, १५० रुपयांची पाणी कॅन! पालकमंत्री पंकज भोयर यांच्यावर कराडे मास्तरांची तीव्र टीका
भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांच्यावर वर्धा जिल्ह्यातील शिक्षक नितेश कराळे (मास्तर) यांनी जोरदार टीका केली. भंडाऱ्यातील प्रचार सभेत आपणच बोचऱ्या शब्दांत भाष्य करत त्यांनी पालकमंत्र्यांच्या तथाकथित गैरव्यवहारांचे आरोप करत चौकशीची मागणी केली. मास्तर म्हणाले, “तुमच्या भंडाऱ्याचा पालकमंत्री माझ्या जिल्ह्याचा आहे… आणि तो इतका खादाड आहे की वर्ध्यात त्याने ६७ लाखांचा एक लाइट लावला. नरेंद्र मोदी वर्धेला आले तेव्हा कार्यक्रमासाठी दोन हजार ट्रक मुरूम विनारॉयल्टी आणले गेले.”