जालना: जालन्यात 98 लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता कक्षाची मोठी कारवाई; छत्रपती संभाजीनगर रोडवरील टोलनाक्यावरील घटना
Jalna, Jalna | Jan 9, 2026 जालना शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेअंतर्गत प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. शुक्रवार दि. 9 जानेवारी 2026 रोजी रात्री 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर मार्गावरील टोलनाका येथे एसएसटी पथकाने मोठी कारवाई करत 98 लाख रुपयांची अघोषित रोख रक्कम जप्त केली आहे. शुक्रवार, 9 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2.28 वाजताच्या सुमारास टोलनाक्यावर तैनात असलेल्या एसएसटी पथकाने एम.एच. 21 बी.एफ. 8733 क्रमांकाच्या गाडीत रक्कम आढळली.