साकोली: सावरबंध येथे वापरलेला औषधसाठा फेकणाऱ्यावर कारवाई करण्याबाबत ग्रामपंचायतच्यावतीने साकोली पोलीस स्टेशनला दिले निवेदन
सावरबंध येथे दवाखान्यामध्ये वापरलेले वेस्ट मटेरियल सुमारे आठ पोते हे फेकण्यात आले आहेत.अज्ञात व्यक्तींनी पर्यावरणाला धोका निर्माण होईल व रोगराई पसरेल असे साहित्य योग्य विल्हेवाट न लावता फेकलेले आहे सावरबंधच्या सरपंच व उपसरपंच यांनी हे साहित्य फेकणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनातुन साकोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या कडे शुक्रवार दि14 नोव्हेंबरला दुपारी 4वाजता केली आहे